पोलीस स्टेशन सावांगी (मेघे) येथील खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीना केले जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 13/09/25 रोजी सालोड हिरापूर येथील तलावाच्या बाजूला विशाल उर्फ ब्लेड विठ्ठल उजवणे राहणार सालोड हिरापूर याच्या गळ्याला फास आवरून कोणीतरी त्याला तळ्याच्या बाजूला मारून टाकल्या बाबत तक्रार प्राप्त झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सावंगी येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हाचे वेळी त्याचेसोबत बॉबी महेशगौरी व विजय मसराम दोन्ही राहणार सालोड हिरापूर हे सोबत असल्याबाबत माहिती मिळाली तसेच घटने नंतर दोघेही फरार झाल्याने त्यांचेवर दाट शंका उत्पन्न झाली. सदर दोन्ही आरोपी घटना केल्यानंतर फरार झाल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर आरोपीचे शोधकामी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके तयार करून सदर आरोपीचा शोध घेणे बाबत सूचना देऊन पाठपुरावा घेऊन सदर दोन्ही पथकांनी सदर आरोपीचा शोध सालोड गावातील आजूबाजूच्या जंगल भागात शेत शिवारात, शेतातील कोठ्यात, आजूबाजूचे शेतातील सर्व बंडे तसेच आजूबाजूच्या गावात गुन्हा दाखल झाल्यापासून घेतला असता आरोपी वारंवार आपले राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने ड्रोनचे सहाय्याने जंगल व शेत शिवार परिसरात पाहणी केली. आरोपी फिरत असलेले परिसराची स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पो स्टे सावांगी चे पथक यांनी घेराबंदी करून दिवस व रात्र शोध मोहीम राबवली.
दिनांक 16.09. 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाला माहिती मिळाली की सदर आरोपी हे पडेगाव शेत शिवारात फिरत आहे अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पडेगाव शिवारात रवाना होऊन सदर दोन्ही आरोपी हे शेतातून पळून जाताना दिसले त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता आरोपी नामे 1. बॉबी दिलीप महेशगौरी, वय 25 वर्ष, 2. विजय देवरावजी मसराम, वय 19 वर्ष, दोन्ही राहणार सालोड हिरापूर सदर आरोपींनी खून केल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन सावंगी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, उप विभा पो अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सपोनि पंकज वाघोडे,पो उपनी उमाकांत राठोड, विजय सिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, अमरदीप पाटील, राजेश अकाली, संजय राठोड, अरविंद इंगोले, सुमेध शेंद्रे सायबर सेल चे अंमलदार अक्षय राऊत, यांनी केली.