“स्वच्छता ही सेवा 2025” मोहिमेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपुर : केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA) भारत सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” (स्वच्छोत्सव) ही मोहीम देशभरात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने घुग्घुस शहरातील शारदोस्तव महिला मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिलांना “स्वच्छता ही सेवा 2025” पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा सादर करण्यात आली तसेच शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी त्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात नगरपरिषदेचे कर्मचारी, स्थानिक महिला व समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या मोहिमेद्वारे शहरात स्वच्छतेचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.