ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी पोलीसांची धडक कार्यवाही

कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांची केली सुटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- दि. ०२.०२.२०२६ रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाणे येथील शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलींग करीत असतांना, ” देऊळगाव येथुन वाहणामध्ये गोवंशीय जनावरे कोंबुन कत्तलीसाठी नेणार असल्याबाबत” गोपनीय माहीती मिळाल्याने देऊळगाव रोडवरील श्री.क्षेत्र वाघोबा देवस्थान तपाळ फाट्याजवळ अत्यंत शिताफिने सापळा रचुन महींन्द्रा बोलेरो पिक अप वाहन क्र. एम.एच. ३८ ई. २६१० हिला पंचासमक्ष थांबवण्यात आले व सदर वाहणाची झडती घेतली असता, सदर महींन्द्रा बोलेरो पिक-अप चा डाला हा ताळपत्रीने झाकुन असल्याने सदर ताळपत्री काढुन पाहणी केली असता त्यामध्ये एकुन ०४ गोवंशीय बैल हे अतिशय दाटीवाटीने, कोणत्याही चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करता, कोणतीही काळजी न घेता, वाहतुकीचा परवाना नसतांना, गोवंश बैल यांना क्रूरपणे, निर्दयतेने वागवितांना मिळुण आल्याने गोवंशीय बैल व महीन्द्रा पिक-अप असा एकुन ४,६०,०००/- रु चा माल घटनास्थळी मिळुण आल्याने आरोपी नामे ०१) गजानन श्रीराम गडदे रा. खेर्डा, ता.जि. हिंगोली ०२) अरविंद नानाजी बुल्ले, रा. देऊळगाव, ता. ब्रम्हपुरी यांना ताब्यात घेवुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी श्री. दिनकर ठोसरे सा, पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले सा. यांचे मार्गर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथक चे सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे सा. यांचे नेतृत्वामध्ये पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार वशिष्ट रंगारी, प्रविन भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान व स्वप्नील पळसपगार यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये