ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास गती

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघामध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेगाने सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक २९ जून २०२६ रोजी मतदार संघात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, झोनल अधिकारी, पर्यवेक्षक आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे एक दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण वर्गाला सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री. संजय खडसे यांनी उपस्थित राहून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक असणारे SIR किट’ आणि एनुमरेशन फॉर्म’चे वितरण करण्यात आले.

प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

या प्रशिक्षण कार्यक्रमाला सिंदखेडराजा व परिसरातील विविध विभागांतील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने:

 प्राध्यापक संजय खडसे* (मतदार नोंदणी अधिकारी)

 श्री. अजित दिवटे* (तहसिलदार, सिंदखेडराजा)

 श्री. आशिष बोबडे* (मुख्य अधिकारी, नगर परिषद)

 श्रीमती रचना जाधव** (उप अधीक्षक, भुमी अभिलेख)

 श्री. प्रवीण कुमार वराडे*(नायब तहसीलदार)

 श्री. नागेश खरात* (नायब तहसीलदार)

 श्री. संदीप बंगाळे** (नायब तहसीलदार)

 श्री. गणेश देशमुख* (सहाय्यक महसूल अधिकारी)

 श्री. रामेश्वर कहाळे* (सहाय्यक महसूल अधिकारी)

 * श्री. अजित बांगर* (गट विकास अधिकारी, सिंदखेडराजा)

 श्री. उमेश देशमुख* (गट विकास अधिकारी, लोणार)

 श्री. मारुती थोरवे* (भुमी अभिलेख)

 श्री. एस. के. निकम*(गटशिक्षण अधिकारी)

 श्री. संजय सोनुणे* (अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना)

यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, झोनल अधिकारी, पर्यवेक्षक आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व त्याचा नियोजित हेतू साध्य करण्यासाठी तहसिल कार्यालय सिंदखेडराजा येथील सर्व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले. या मोहिमेमुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील मतदार पुनरीक्षण प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये