शिख समाजावर अन्याय करणारे प्रस्तावित अधिनियम 2026 त्वरित बरखास्त करा
गुरुद्वारा साध संगत गडचांदूरची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड अधिनियम 1956 कायम ठेवावे व प्रस्तावित अधिनियम 2026 तसेच धारा 11 चे संशोधन तत्काळ रद्द करावे,1956 पासून लागू अधिनियम च्या अंतर्गत लोकतांत्रिक प्रक्रिया च्या माध्यमातून दर तीन वर्षांनी निवडणूक होऊन चेअरमन ची निवड करण्यात येते,मात्र धारा 11 मध्ये संशोधन करून प्रशासक नियुक्त करण्यात आल्यामुळे शिख समाजामध्ये तीव्र विरोध होत आहे,1956 अधिनियम समाप्त करून नवीन अधिनियम 2026 लागू केल्यास केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देश विदेशात शिख समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत, म्हणून सचखंड गुरुद्वारा बोर्ड नांदेड अधिनियम 1956 ला कायम ठेवावे व धारा 11 मध्ये केलेले संशोधन रद्द करावे व प्रस्तावित अधिनियम 2026 तत्काळ वापस घ्यावे अशी मागणी गुरुद्वारा साध संगत गडचांदुर च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे, तशा मागणी चे निवेदन तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे



