ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारुची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिस स्टेशन रामनगर यांनी घेतले ताब्यात

दारूबंदी पथकाचे पोलिसांनी आरोपीला अटक करून 5 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन रामनगर वर्धा येथील दारुबंदी पथकाचे पोलिस हवालदार अवि बनसोड व त्यांच्या पथकाला गुप्तवार्ता प्राप्त करून दारुबंदी पथकाचे पोलिस हवालदार व पोलिस कर्मचारी यांनी बुध्द टेकडी जवळ देशमुख नगरी रामनगर वर्धा घटनास्थळी जाऊन नाकेबंदी करण्यात आली आणि प्रोरेड करून आरोपी पासून निळ्या प्लास्टिक मोठ्या थैलीत टॅंगो पंच देशी दारू 90 एम एल च्या 400 शिश्या किंमत 40,000/- रुपये व एक पांढरा रंगाची मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर कंपनीची चार चाकी कार क्रमांक एम एच 27-बी.ई0062 किंमत 5,0000/- रुपये एकुण किंमत 5,40,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि आरोपी नामें प्रणय राजेंद्र फुलझेले वय 28 वर्ष राहणार वरुड सेवाग्राम रोड चरखा गृह मागे वर्धा यांच्या वर पोलिस स्टेशन रामनगर वर्धा येथे अप. क्र. 595/26 कलम 65(अ )(ई ),77(अ )म दा का /सह कलम 3(1),181,177,मो. वा.का.दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगर वर्धा येथील पोलिस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदी पथकाचे पोलिस हवालदार अवि बनसोड मनोज भोमले मुकेश वांदिले विकी अणेराव यांनी केलेली आहे पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर वर्धा पोलीस कर्मचारी करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये