ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी समुदायाच्‍या हक्‍कांकरिता भाजपा कटीबध्‍द – राहूल पावडे

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर द्वारा जागतिक आदिवासी दिवस उत्‍साहात साजरा

चांदा ब्लास्ट

आदिवासी जन समुदायाचे हक्‍क वृध्‍दींगत करणे व त्‍यांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करीत आदिवासी जनसमुदायाचा जगण्‍याचा स्‍तर उंचावण्‍याच्‍या उद्देशाने जगभरामध्‍ये ०९ ऑगस्‍ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. यामुळे आदिवासी जनसमुदांमध्‍ये त्‍यांच्‍या हक्‍कांविषयी जनजागृतीचे मोठे कार्य केले जाते, असे प्रतिपादन जागतिक आदिवासी दिनानिमित्‍त भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष राहूल पावडे यांनी व्‍यक्‍त केले.

दि. ०९ ऑगस्‍ट २०२३ रोजी जेल परिसरातील वीर पुलेश्‍वर बाबुराव शेडमाके यांच्‍या स्‍मारकाला वंदन करून जागतिक आदिवासी दिवस व क्रांतीदिन राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी चंद्रपूर द्वारा साजरा करण्‍यात आला. केंद्र व राज्‍यशासन आदिवासी समुदायाच्‍या उन्‍नतीकरिता सातत्‍याने प्रयत्‍न करीत आहे. या समुदायाला प्रत्‍येक क्षेत्रात योग्‍य प्रतिनि‍धित्‍व मिळावे यासाठी देखिल शासन कटीबध्‍द आहे. याचाच एक भाग म्‍हणून राष्‍ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मू यांची नियुक्‍त करण्‍यात आली, तसेच विश्‍वगौरव प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी १५ नोव्‍हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्‍मदिवस “जनजातीय गौरव दिवस” म्‍हणून साजरा करण्‍यात यावा, अशी घोषण केली आहे, असे ही राहूल पावडे म्‍हणाले. याप्रसंगी वीर पुलेश्‍वर बाबुराव शेडमाके यांच्‍या स्‍मारकाला सर्वांच्‍या वतीने पुष्‍पहार अर्पण करून वंदन करण्‍यात आले.

यावेळी प्रामुख्‍याने प्रमोद कडू, अल्‍काताई आत्राम, रविंद्र गुरनुले, अरुण तिखे, रामपाल सिंह, धनराज कोवे, दिनकर सोमलकर, विठ्ठल डूकरे, रवी लोनकर, संदिप आगलावे, अजय सरकार,किरण बुटले, भारती दुधाणी, शितल आत्राम, शुभम गेडाम, अरविंद मडावी, किशोर आत्राम, विक्‍की मेश्राम, तृष्‍णा गेडाम, गिता गेडाम, सिमा मडावी, जयश्री आत्राम, रवी चहारे, रुद्रनारायण तिवारी, खंगार सर,विनोद शेरकी, बडू गौरकार, अविनाश उत्तरवार, बी.बी सिंग,चांदभाई सय्यद, सत्‍यम गाणार, , सुर्या खजांजी, विजय चिताडे, रवी तुमराम, अमित गेडाम, राजेश यादव, सागर भगत, गणेश सिडाम, अंजली कुळमेथे, मोनिषा महातव, रेणुका घोडेस्वार, आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये