पो.स्टे. सेवाग्राम पोलीसाकडुन मोटर चोरीचे गुन्हे उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी नामे वैभव दिनेश राउत वय 22 वर्ष रा. येसंबा ता.जि. वर्धा यांचे तकारी वरुन पोलीस स्टेशनला अप क. 272/2026 कलम 303 (2), बीएनएस अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयात फिर्यादी तसेच आजुबाजुचे शेतकरी यांचे विहिरीतील पाण्याच्या 09 सबमर्शिबल मशिन व 01 पाण्याची वरील मोटर असा तु. किं 32,000/रु चा माल कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरुन नेल्याबाबत सदरचा गुन्हा नोंद असुन तपासात आहे.
सदर गुन्हयाचा समातर तपासादरम्याण मिळालेल्या माहितीवरुन 1) सागर रामदासजी मानकर वय 32 वर्ष रा. रुईखैरी ता.जि. नागपूर 2) रामकृष्ण उर्फ गौरव प्रमोद हिवंज वय 34 वर्ष रा. येसंबा ता.जि. वर्धा 3) वैभव गणपत सोनटक्के वय 28 वर्ष रा. दुर्गामाता मंदिर बुट्टीबोरी ता. जिल्हा, नागपूर 4) मयुर राजेश उईके वय 25 वर्ष रा. हेटीवाही ता. हिंगणा, ह.मु रुईखैरी, ता. जिल्हा, नागपूर. यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्यांनी येसंबा व पुजई शिवारातुन चोरी केलेल्या विहिरीतील पाण्याच्या 09 सबमर्शिबल मोटर व विहिरीच्या वरील असलेली 01 मोटर तसेच गुन्हयात वापरण्यात आलेली स्कॉरर्पियो गाडी, व एक होडा कंपनीची पॅशन मोटर सायकल असा जु. किं 6,43,000/रु चा माल मिळुन आल्याने जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल सा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सा, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर सा, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर सा, प्रभारी ठाणेदार, सपोनि रासकर साहेब,, पोउपनि जगताप साहेब बाबर्डे साहेब, पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार संजय लाडे, स्वप्नील मोरे, धीरज मिसाळ, प्रदिप कुचनकर चापोहवा विलास लोहकरे, अजय वानखेडे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेलचे अक्षय राउत, गोविंद मुंडे यांनी केली.



