ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“दारू मालाची वाहतुक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अवैध दारू विक्री व वाहतुक करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने दारू विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 16 जुन 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पो.स्टे. सिंधी (रेल्वे) हद्यीतील चिचघाट पुरा नाल्यावरील रोडवर होंडा सिटी कार क्र. एम.एच. 49 बि. 9277 वर सापळा रचुन प्रो.रेड केला असता.,

आरोपी 1) सचिन उर्फ सोनु राजेंद्र कतलकर, 2) रोहित उर्फ राकेश बाबारावजी परखड, 3) अभिजीत परमेश्वर घोडे, तिन्ही सिंधी (रेल्वे), जि. वर्धा हे मोठ्या प्रमाणात 12 खरर्ड्याचे खोक्यात विदेशी दारू व 06 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारू मालाची वाहतुक करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आले असुन, सदर दारूचा माल हा नमुद आरोपी तसेच 4) प्रणय डंभारे रा. सिंधी (रेल्वे) यांचे मालकिचा असुन, आरोपी अभिजीत घोडे हा त्यांचेकडे दारूविक्रीचे काम करीत असुन, सदर विदेशी दारूचा माल हा आरोपीतांनी मध्य प्रदेश येथुन आणला असुन, देशी दारूचा माल हा सावंगी (आसोला) येथील आ.क्र. 5) मुकेश जैयस्वाल याचे देशी दारू दुकानातुन खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपीतांचे ताब्यातुन एक होंडा सिटी कार व देशी-विदेशी दारूचा माल जु.कि. 12,50,800 रू चा मुद्देमाल जप्त करून, 05 आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सिंधी (रेल्वे) येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये