ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जायंटसच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षा शायना एन.सी यांची घेतली पदाधिकाऱ्यांनी भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तथा शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव शायना एन . सी.यांनी महिला शिवसेनेची राज्यात ताकद अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्यव्यापी *शिवदुर्गा संवाद यात्रेस* प्रारंभ केला असून दिनांक 17 जून 26 रोजी संभाजी नगर विमान तळावर संभाजी नगर येथिल जायंटस वेलफेअर फाऊंडेशन फेडरेशन दोन ब च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन जायंट्स परिवाराच्या वतीने सुरू शहरात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

त्यांनी यावेळी समाधान व्यक्त करत ग्रुपने अवयव दान चळवळ अधिक गतिमान करावी असे सुचवले व सामजिक उपक्रम राबऊन या भागात अधिक जायंट्स ग्रुप ची स्थापना करून नवीन सदस्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले यावेळी स्पेशल कमिटी मेंबर श्रीमती सूर्यमाला मालानी, फेडरेशन दोन ब चे माजी अध्यक्ष अमित मालानी, चंचल मालानी, नीलिमा सारडा, नंदूभाई पटेल, सरिता मालानी, पंकज वालसेकर ,सपना वालसेकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये