ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा काँग्रेसच्या वतीने कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करून निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र शासनाने 2 जून रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासन निर्णय काढून फसवी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे, मात्र या योजनेत अनेक अटी व शर्ती टाकून शेतकऱ्यांना कर्ज माफी चा लाभ मिळणार नाही, फसवी योजना जाहीर करून शेतकऱ्याची फसवणूक केली असल्याचा आरोप बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिंदखेड राजा येथे 16 जुन रोजी कर्जमाफी च्या शासन निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन 2 जून रोजी काढण्यात आलेला कर्जमाफी चा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा व जाचक अटी काढून सरसकट कर्जमाफी देण्याबाबत नवीन शासन निर्णय काढावा अशी मागणी करण्यात आली.

आंदोलन करताना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामविजय बुरुंगले, जिल्हा सरचिटणीस सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष सुनील जायभाये, शहर अध्यक्ष कदीर कुरेशी, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, शहर अध्यक्ष अतिश कासारे,अनिल सावजी, हनीफ शहा, शौकत भाई, रवी इंगळे, नामदेव राठोड, दिलीप गाडेकर, सदानंद वाघमारे, विलास जाधव, सत्यजित खरात, प्रकाश राजे जाधव, भिमराव काकडे, सुभाष कोकाटे, तुषार खरे, शिवराज पाटील, माधव काळुशे, तथा इतर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये