ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत १९ फेब्रुवारीला ‘स्वराज्य रयतेची मॅरेथॉन’

शिवजयंतीनिमित्त धावणार शेकडो पावले : भद्रावती उत्सव समितीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भद्रावती उत्सव समितीच्या वतीने ‘स्वराज्य रयतेची मॅरेथॉन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. “जनसामान्याचे पाऊल, सुदृढ महाराष्ट्राची चाहूल” हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित केलेली ही मॅरेथॉन १९ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. स्वराज्य, पर्यावरण संरक्षण आणि सुदृढ आरोग्य या त्रिसूत्रीचा संदेश देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विविध वयोगटात रंगणार स्पर्धा

या मॅरेथॉनमध्ये मुले आणि मुलींसाठी वयोगटानुसार चार स्वतंत्र गट करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुलांचा गटा करिता गट ‘अ’ (१५ वर्षांखालील): प्रथम पारितोषिक – १००० रु., द्वितीय – ७०० रु. तर तृतीय – ५०० रु. तसेच गट ‘ब’ (१५ वर्षांवरील): प्रथम – २००० रु., द्वितीय – १५०० रु., तृतीय – १००० रु.

मुलींच्या गटा करिता गट ‘क’ (१५ वर्षांवरील) प्रथम – १००० रु., द्वितीय – ७०० रु., तृतीय – ५०० रु. तर गट ‘ड’ (१५ वर्षांखालील) प्रथम – १००० रु., द्वितीय – ७०० रु., तृतीय – ५०० रु. असे बक्षीसे ठेवण्यात आले आहे.

  “पर्यावरण रक्षण आणि उत्तम आरोग्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे. शिवजयंतीचा उत्साह खेळाच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे,” असे आवाहन भद्रावती उत्सव समितीने केले आहे.

सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये