ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विषबाधा झाल्याने शेकडो मासोळ्यांचा मृत्यू

शेतकऱ्याचे मोठे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

पावसाचा लपंडावामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट आले. यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या संकटाशी दोन हात करणाऱ्या रमेश ठुसे या शेतकऱ्याचा शेत तळ्यात अज्ञात व्यक्तीने विष कालवलं. त्यामुळे हजारो मासे मृत झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रमेश ठुसे यांची शेती धाबा-पोडसा मार्गाला लागून आहे. त्यांचा शेत तळ्यात जनावरे आपली तहान भागवीत असतात. भविष्यात शेतकऱ्यांचे धन असलेले पाळीव जनावरे दगावू शकण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान ठुसे यांनी धाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात रमेश ठुसे यांची तीन एकर शेती आहे. त्यांची शेती धाबा-पोडसा राज्य मार्गाला लागून आहे. या शेतातील शेततळ्यात ते दरवर्षी विविध प्रजातींच्या मास्याचे उत्पादन घेत असतात. मागील वर्षीचे जवळपास दोन क्विंटलचे मासे त्यांचा शेत तळ्यात होते.

पुढील एक महिन्यानंतर ठुसे मासे विक्रीला काढणार होते. मात्र गुरुवारच्या रात्री मासेचोरांनी शेत तळ्यात विषारी द्रव्य टाकलं. त्यामुळे तळ्यातील शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ठुसे यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान ठुसे यांनी धाबा उप पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये