ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा सभासदांसाठी स्तुत्य उपक्रम

मृतक सदस्यच्या परिवाराला आर्थिक मदत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ अनैशा वाहन चालक कामगार संघटना ही वाहन चालक कामगार यांच्याशी संबंधित कार्य करणारी पंजीबद्ध संस्था आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी अपघातग्रस्त कुटुंबाला एक आधार या उपक्रमांद्वारे या संस्थेशी जुडलेल्या सभासदांचा अपघात होऊन जबर दुखापत झाल्यास त्यांच्या दुरूस्ती पर्यंत तसेच सभासदांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उपक्रमाची नव्याने सुरुवात करण्यात आली आहे.

संघटनेचे सक्रिय सभासद असलेले उमाकांत वाघमारे अगदी सुरुवातीपासून संघटनेच्या कार्याशी जोडून अगदी तनमनधनाने काम करीत होते. यांचे चंद्रपूर येथे जनता कॉलेज जवळ तारीख ०५ मे २०२६ ला अपघातात निधन झाले. यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यांच्या पश्चात यांची पत्नी- सोनम आणि दोन अपत्ये मुलगा विराज ११ वर्ष मुलगी कु. नव्या वय ९ वर्ष आहेत.

दिवंगत उमाकांत वाघमारे हे संघटनेचे सक्रिय पदाधिकारी होते. यांच्या अपघाती निधनाबद्दल संघटनेच्या वतीने तारीख ६ जुलै २०२६ ला सकाळी १०: ०० वाजता स्थळ- साखरी (वाघोबा) तह. राजुरा जिल्हा चंद्रपूर दिवंगत उमाकांत वाघमारे यांच्या कुटुंबीयांना सांत्वनापर भेट देण्यात आली.

संघटनेबद्दल त्यांचे योगदान संघटना कधीच विसरू शकत नाही. संघटनेच्या सभासदांचे संघटनेबाबत योगदान लक्षात घेऊन संघटनेने अपघातग्रस्त कुटुंबाला संघटनेतर्फे दरमहा दीड हजार रुपये योगदान आणि अपघातग्रस्त कुटुंबातील शाळकरी मुलांना मुलांच्या शिक्षणाचा ३०% वाटा अनैशा वाहन चालक कामगार संघटना उचलण्याचे निश्चित केले आहे.

तसेच संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनंताभाऊ रामटेके यांच्यावतीने दरमहा दीड हजार रुपये मासिक योगदान देण्यात येणार आहे.

सदर प्रसंगी सपना अनता रामटेके यांनी दिवंगत उमाकांत वाघमारे यांच्या पत्नी सोनम उमाकांत वाघमारे यांना साडीचोळी भेट दिली.

संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते चंपतभाऊ राजुरकर कुकुडसाथ यांच्यावतीने संघटनेचे यांनी इयत्ता १२ वी पर्यंत ट्युशन सहित एका मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे सभासद नोंदणी असलेल्या अपघातग्रस्त कुटुंबातील शिकत असलेल्या शाळकरी मुली मुलांच्या शिक्षणाचा ३०% वाटा संघटना उचलणार असल्याचे सांगण्यात आले.

सदर प्रसंगी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, जिल्हाध्यक्ष अनंताभाऊ रामटेके, युवा जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चंपतभाऊ राजुरकर कुकुडसाथ, संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे, नांदेड जिल्हाध्यक्ष अय्युबभाई, सपना अनंता रामटेके, सोनम उमाकांत वाघमारे, पुष्पा प्रभुदास नंदेश्वर, अंकुश नंदेश्वर, सामा. कार्यकर्ते प्रकाश रंभाजी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये