ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भक्तिरसात रंगणार नऊ रात्री ; गरब्यातून देवीचा जागर

हिंगणघाटात सार्वजनिक हनुमान मंदिरातर्फे रास रसिका नवरात्री उत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणघाट : आदिशक्तीच्या आराधनेसोबत भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा संगम साधण्यासाठी शहरातील मारोती वॉर्ड क्रमांक २ मधील स्व. मीनाताई बा. ठाकरे बाल उद्यान येथे सार्वजनिक हनुमान मंदिराच्या वतीने रास रसिका नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

  प्रा सुरेखा देशमुख, राजुरकर मॅडम, राऊत मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उत्सवामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत स्थानिक महिलांच्या सहभागातून गरबा उत्सवाच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री वेगवेगळ्या कार्यक्रमांतून देवीची आराधना, पारंपरिक गरबा आणि सामूहिक सहभागाला प्राधान्य दिले जात आहे.

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सवाला विशेष रंगत आली असून, पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि सामाजिक एकोपा वाढविण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. देवीच्या भक्तीत तल्लीन होऊन गरब्याच्या तालावर नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी परिसरातील महिला सहभागी होत आहेत. श्रद्धा आणि संस्कृतीचा हा उत्सव परिसरातील आकर्षण ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये