गुरुद्वारा साध संगत येथे गुरुनानक जयंती साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गुरुद्वारा साध संगत गडचांदूर येथे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी गुरुद्वारा येथे सायंकाळी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम रहिरास साहेब, गुरबाणी कीर्तन, अरदास, लंगर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवराव भोंगळे, नगर परिषद चे उपाध्यक्ष संजय मेंढी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, नगर परिषद चे आरोग्य सभापती तुषार बावणे, उपस्थित होते, यावेळी गुरुद्वारा साध संगत चे अध्यक्ष गोपाल सिंग सचदेव, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष हंसराज चौधरी, विश्वंभर झाम, गुरप्रीत सिंग सचदेव, सतनामसिंग, इंदर सिंह कश्यप, मोनू खुराणा, तथा इतर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी गुरुनानक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी आमदार देवराव भोंगळे व इतर मान्यवराचा गुरुद्वारा कमिटी च्या वतीने सत्कार करण्यात आला, कार्यक्रमात राजुरा, बल्लारपूर, घुघुस, कागजनगर येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.



