ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत ७५-वरोरा विधानसभा मतदारसंघातील वरोरा व भद्रावती तालुक्यांतील सर्व मतदान केंद्रांवर दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रक्रियेअंतर्गत मयत, दुबार, स्थलांतरित व गैरहजर मतदारांच्या गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन दिनांक १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येत आहे. प्राप्त गणना प्रपत्रांवरील कार्यवाही दिनांक १० डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दिनांक २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारांना गणना प्रपत्र (Enumeration Form) वितरित करण्यात आले होते; मात्र अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) अशा कारणांमुळे ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

त्यानुसार, संबंधित मतदारांनी दिनांक २८ व २९ नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष शिबिरादरम्यान आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून आवश्यक गणना प्रपत्र व संबंधित घोषणापत्र सादर करावे. या शिबिराच्या माध्यमातून कोणताही पात्र मतदार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या संधीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

तरी वरोरा व भद्रावती तालुक्यातील सर्व मतदारांनी या विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. संदीप भस्के, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वरोरा तसेच श्री.योगेश कौटकर तहसीलदार वरोरा,श्री. संदीप पानमंद, तहसीलदार, भद्रावती यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये