ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू ; मुलगा गंभीर जखमी!

लाठी येथील हृदयद्रावक घटना; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, शासकीय मदतीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ शेतात कापूस वेचणीचे काम सुरू असताना मधमाश्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यात लाठी येथील शेतकरी प्रल्हाद पांडू नगराळे (वय अंदाजे ७० वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्यांचा मुलगा गणपत प्रल्हाद नगराळे हा गंभीर जखमी झाला असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी तोहोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना अचानक मधमाश्यांनी दोघांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात प्रल्हाद नगराळे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गणपत नगराळे यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे लाठी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नगराळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कुटुंब संकटात आहे. त्यातच कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संकटाच्या काळात शासनाने घटनेची दखल घेऊन पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व शासकीय योजनांचा लाभ द्यावा, तसेच गंभीर जखमी गणपत नगराळे यांना योग्य उपचार मिळावेत, अशी मागणी गावस्तरावरून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये