ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवसाढवळ्या अवैध रेती वाहतूक- उपसा होत आहे

प्रशासन हतबल - शहरातील विविध भागात दैनंदिन येते शेकडो ब्रास रेती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     विविध ठिकाणी अवैध रेती साठा होत आहे पथकाच्या समोर..

 दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये खडकपूर्णा धरणातील पाणीसाठा हा मृत साठ्यात गेला असून त्यामुळे धरण आणि नदीकाठ परिसर अवैध रेती उपसा तसेच वाहतूक तस्करांसाठी एक हिरवे कुरण ठरत असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले .. अल्पवृष्टीमुळे विभागातील नदी नाले हे कोरडे ठाण पडलेले असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले खडकपूर्णा धरण हे मृत साठ्यात गेले असून त्यामुळे धरणात तसेच धरण परिसरात रेती उपसा करण्यासाठी तस्करांना मोठे कष्ट घ्यावे लागत नाही नेहमी पाण्यात असणाऱ्या अवैध रेती उपसा करणाऱ्या अवाढव्य बोटी आणि इतर यंत्रसामग्रीसह तस्करांनी धरणावर आपला ताबा मिळवलेला आहे.. त्यामुळे दिवसाकाठी शेकडो ब्रास रेती उपसा करून इच्छित स्थळी पुरवठा रात्री तर करतातच परंतु दिवसा सुद्धा करत असल्याचे वास्तव उघड झालेले आहे. *शहरात विविध भागात दाखल होते शेकडो ब्रास अवैध रेती* शहरातील विविध भागामध्ये त्यामध्ये कुंभारी,पिंपळनेर, शहरातील विविध प्रभाग संजय नगर बायपास परिसर अशा विविध ठिकाणी अवैध रेती तस्करांनी आपले बस्तान मांडले असून, तस्कर सदर ठिकाणी रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा करून, मागणी प्रमाणे वितरित करीत असल्याने, दिवसा ढवळ्या होणाऱ्या अवैध रेती प्रणालीवर प्रशासन कार्यवाही का करत नाही याविषयी जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. *प्रशासनाचा कार्यवाहीचा नौटंकीपणा. नाममात्र कार्यवाही करून मासिक कोरम पूर्ण* महसूल आणि पोलीस प्रशासनाने अवैध रेती वाहतूक तसेच उपसा करणाऱ्या तस्करांवर नियंत्रण करण्यासाठी नियुक्त केलेले पथक खडकपूर्णा आणि इतर ठिकाणी आपली पेट्रोलिंग करतात आणि खाली हाताने वापस येत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, रेती तस्कर पकडण्यासाठी खडकपूर्णात्मक जात शहराच्या सर्व प्रमुख मार्गावर रात्रंदिवस नाकेबंदी केल्यास शासनाचा पेट्रोलिंग खर्च आणि प्रशासनाने नियुक्त केलेल्या कामासाठी सुद्धा अतिरिक्त वेळ भेटेल, परंतु सदरहू पथक तसे न करता फक्त आपल्या पथकाचे अस्तित्व दाखवण्यासाठी खडकपूर्णा परिसरात रिकाम्या गिरट्या घालत असल्याने शासनाच्या पगारांसह होणाऱ्या वर कमाईची चर्चा चौका चौकात खमंगपणे होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. *अधिकारी हतबल – कर्मचारी वरचढ, कर्मचाऱ्यांना स्थानिक असल्याचा फायदा* विभाग पोलीस स्टेशन असो की महसूल अधिकारी हे शासकीय नियमाप्रमाणे तीन ते चार वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली या ठिकाणावरून होत असते, मात्र सिंदखेडराजा उपविभागातील महसुलातील कर्मचारी महसूल अधिकाऱ्यापासून ते मंडळ अधिकाऱ्यापर्यंत यांच्या बदल्या सिंदखेडराजा तालुक्यातून देऊळगाव राजा आणि येथून तिकडे याव्यतिरिक्त आतापर्यंत काही झाल्या नाही, काही कर्मचारी तर नियुक्त झाल्यापासून दोन्ही तालुक्याच्या बाहेर गेलेले नाहीत,काही अधिकाऱ्याचे प्रमोशन सुद्धा तालुक्यातच होऊन पदभार मिळाल्याने हेच स्थानिक ते अधिकारी वरिष्ठांची दिशाभूल करून आपला कार्यभाग सिद्धीस येताना दिसत आहे याकडे मात्र लोकप्रतिनिधींनी लक्ष घालने गरजेचे असल्याचे जनतेतून मागणी होत आहे. *प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे सीडीआर तपासावे* महसूल प्रशासनातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दैनंदिन हालचालीवर पाळत ठेवत असल्याने अधिकाऱ्यांची तंतोतंत माहिती ही तस्करांपर्यंत पोहोचते त्यामुळे कार्यवाहीसाठी गेलेल्या अधिकाऱ्याला हात हलवत परत यावे लागत लागते, मात्र अधिकाऱ्याचा दौरा आटोपल्या नंतर त्याच मार्गाने वेगाने अवैध रेतीची वाहतूक होते. या संदर्भात अधिकाऱ्यांनी महसुलातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे मोबाईल कॉल नियमाप्रमाणे पडताळणी केल्यास खरे गुन्हेगार कोण हे पकडण्यास अधिकाऱ्यांना मदत होईल, परंतु अधिकारी सुद्धा त्यामध्ये फारसे स्वाराश्य दाखवत नसल्याने दोन-तीन वर्ष आपल्याला या ठिकाणी राहायचे कशाला पंगा घ्यायचा अशा प्रकारचे मार्गदर्शन सदर अधिकाऱ्यांनी होत असल्यामुळे तेसुद्धा त्यामध्ये फारसे स्वारशः दाखवत नसल्याचे चित्र उघडकीस आले आहे.

 अवैध रेती उपसा, वाहतूक आणि साठ्या संदर्भात दैनंदिन तक्रारी प्राप्त होतात त्यानुसार पथक कार्यवाही करते खडकपूर्णा नदी पात्रात होणाऱ्या अवैधपणे रेती उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षाची नियुक्ती केलेली आहे त्यांचे दैनंदिन कामाची तपासणीकरण्यात येईल, त्यामध्ये कोणीही दोषी आढळल्या शासकीय नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल –

प्रा. संजय खडसे- उपविभागीय अधिकारी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये