ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील कविता लेखन स्पर्धेत कु. मानिनी नायडू हिने पटकावला द्वितीय क्रमांक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा :_ स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मानिनी नायडू हिने जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील कविता लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. बुलढाणा येथील पोलिस अधिकारी संग्राम पाटील तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

दिनांक २६ नोव्हेंबर रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला. या युवा महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने कविता लेखन स्पर्धेत कु. मानिनी नायडू या बी. ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने सहभाग नोंदवून द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकावर नाव कोरले. चित्रकला स्पर्धेत अक्षय कव्हळे या बी. ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याने देखील सहभाग नोंदवला.

कु. मानिनी नायडू हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री बालाजी संस्थान, देऊळगाव राजाचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे आणि प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे आणि मार्गदर्शक मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये