ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या -देवाडा खुर्द गावात हळहळ

नापिकी व आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा :_ सततची नापिकी, शेतीवरील कर्ज आणि आर्थिक विवंचनेमुळे देवाडा खुर्द येथील एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रकाश गणूजी बुरांडे (वय ६०) यांनी विष प्राशन केल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना बुधवारला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने देवाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बुरांडे हे शेतीसाठी घेतलेले कर्ज, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे तणावात होते. मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.पोंभुर्णा येथे प्राथमिक उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दि. २५ नोव्हेंबर बुधवारला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, चंद्रपूर येथे उपचार सुरू असतानाच सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये