वडगाव येथील पी.एम. श्री. शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना
अध्यक्षपदी प्रकाश शेडमाके, उपाध्यक्षपदी विठ्ठल आंबेकर यांची सर्वानुमते निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शिक्षण हक्क अधिनियम २००९ अंतर्गत पी.एम. श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव (केंद्र सोनुर्ली, बीट वनसडी, पंचायत समिती कोरपना) येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.
शाळेच्या प्रांगणात दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी पालकांच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालक, ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या सदस्य, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत सर्वानुमते नूतन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी श्री. प्रकाश विश्वेश्वर शेडमाके तर उपाध्यक्षपदी श्री. विठ्ठल माधव आंबेकर यांची निवड करण्यात आली. महिला सदस्य म्हणून सौ. साधना रमेश हूलके, सौ. नलू मारोती कुमरे, सौ. सुरेखाबाई माणिकराव सिडाम, सौ. संगीता संदिप मडावी, श्रीमती गयाबाई बापूजी मोहुले, श्री. चंद्रकला योगेश नांदे, सौ. अस्मिता विठ्ठल मडावी तर पुरुष सदस्य म्हणून श्री. कैलास बापूजी कोयरे, श्री. चंद्रभान साधूजी गाणफाडे, श्री. दत्ता टिकाराम उपासे, श्री. गोविंदा मुरलीधर भोंगले, श्री. प्रशांत देविदास कातकडे यांची निवड झाली. शिक्षण प्रेमी म्हणून श्रीराम भोंगळे गुरुजी यांची निवड करण्यात आली.मुख्याध्यापक हे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश शेडमाके म्हणाले, “शाळेचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ, स्वच्छता, शिस्त व शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी समिती कटिबद्ध राहील. पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून वडगाव शाळेला आदर्श शाळा बनवू.”
*नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व केंद्रप्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक यांनी केले. उपस्थितांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.



