किसान नगरजवळ गडचिरोली आगाराची बस अपघातग्रस्त; ८ प्रवासी जखमी
जखमी, गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल ; चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर जवळील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ चंद्रपूर गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर किसाननगर जवळ आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास गडचिरोली आगाराची एसटी बस अपघातग्रस्त झाली. MH 14 BT 5009 क्रमांकाची ही बस मुख्य रस्त्यावरील खांब तोडून मुकेश बिके यांच्या शेताजवळ जावून नाल्यावर आपटली.
या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले असून, जखमींना तातडीने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या वेळी बसमध्ये चालक म्हणून गुरुदास गेडाम तर वाहक म्हणून प्रकाश कुनघाडकर कार्यरत होते.सदर बस ही गडचिरोली वरून मूल मार्ग गोंडपीपरी ला जाणार होती.
अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघाताच्या कारणांचा तपास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होत आहे.अपघात झाल्याचे कळताच किसान नगर येथील युवक व नागरिकांनी बचावासाठी अथक परिश्रम घेतले..



