तायक्वांडो खेळाडूंची ‘ऑल इंडिया’ स्पर्धेसाठी निवड
निळकंठराव शिंदे महाविद्यालयाची ऐतिहासिक भरारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथे पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन तायकांडो (मुले) स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सुवर्णपदकावर (गोल्ड मेडल) आपले नाव कोरले आहे. या दैदिप्यमान यशामुळे महाविद्यालयाच्या एकूण ०२ खेळाडूंची प्रतिष्ठेच्या ‘ऑल इंडिया कलर कोट’ (भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धा) साठी निवड झाली आहे.
*जयपूर – राजस्थान येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा*
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये ०२ मुलांचा समावेश असून, हे सर्व खेळाडू ०१ ते ०५ डिसेंबर २०२६ दरम्यान विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ (जयपूर- राजस्थान) येथे आयोजित भारतीय आंतर-विद्यापीठ तायकान्डो स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
• निवड झालेला मुलांचा संघ: कु. मनीष मारोती भरडे वर्ग बी.ए. भाग-१, कु. तेजस जनार्धन चौधरी (बी.ए. भाग-१)
*महाविद्यालयातर्फे खेळाडूंचा जाहीर गौरव*
या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सर्व विजेत्या खेळाडूंचा नुकताच जंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रा. डॉ. अजय दहेगावकर, प्रा. कुंदन सहारे, प्रा. नत्थू वाढवे, प्रा. डॉ.राजेश हजारे, प्रा. डॉ. नरेंद्र हरणे,प्रा. डॉ. सचिन श्रीरामे, प्रा. डॉ. सौ. पाटील, प्रा. डॉ. प्रविणकुमार नासरे, प्रा. डॉ. शशिकांत शित्रे आणि प्रा. संदीप प्रधान प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शिक्षकेतर कर्मचारी अजीज शेख, विशाल प्रसाद, सुरज दखणे, विशाल गौरकार, पांडुरंग आखतकर, प्रमोद तेलंग व बंडू पेंदोर यांनी उपस्थित राहून खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*यशाचे मानकरी आणि मार्गदर्शक*
सर्व खेळाडूंनी आपल्या या यशाचे श्रेय शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. विशाल शिंदे व प्रा. रमेश चव्हाण यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले आहे. तसेच या खेळाडूंना चंद्रपूर जिल्हा तायकांडो संघटनेचे सचिव श्री. सतीश खेमस्कर व संपूर्ण संघटनेच्या पदाधिकार्याचे ही मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण भद्रावती परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, राष्ट्रीय स्तरावरही ते सुवर्णपदक पटकावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



