ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी संघटनेला कोरपना नगरीत दुसरा मोठा धक्का! 

सुभाष तुराणकर व आशा झाडे व ईश्वर तुराणकर व अजय झाडे अभिषेक तुराणकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा!

कोरपणा :_ तालुक्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली आहे. शेतकरी संघटनेत कार्यरत असलेले नेते सुभाष तुराणकर यांनी शेतकरी संघटनेला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. कोरपणा येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात हा पक्षप्रवेश पार पडला.

शेतकरी संघटनेत कार्यरत असलेल्या सुभाष तुराणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र येथे झालेल्या या पक्षप्रवेशामुळे कोरपणा तालुक्यातील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. तुराणकर यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी संघटनेतून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या त्यांच्या निर्णयाची तालुक्यात चर्चा सुरू असून, आगामी काळात या पक्षप्रवेशाचे राजकीय पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त करत सुभाष पुराणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, ओम पवार, किशोर बावणे, अमोल आसेकर, पवन भुरेवार, पुरुषोत्तम भोगळे, सुनील बावणे ,उत्तम गेडाम ,सत्यवान धोटेकर, पुंडलिक उलमाले, अभय डोहे, संतोष बोरडे, सुनील देरकर, अरुण मडावी, प्रदीप पिंपळशेडे, दिनेश खडसे, दिनेश इंगळे, तिरुपती किनाके, उमेश कोल्हे, उमेश पालीवाल, अबराल अली, आशिष ताजने, वर्षा लांडगे, यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला.

आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे कोरपणा तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक वाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये