ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत ‘माँ का जगराता’ सोहळा उत्साहात संपन्न!

नामवंत कलाकारांची उपस्थिती; मान्यवरांनी केले स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल श्री. रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या पौर्णिमा आईलवार हिला शैक्षणिक मदत प्रदान

भद्रावती :_ स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल श्री. रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला भव्य ‘माँ का जगराता’ सोहळा मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) शिंदे महाविद्यालयाच्या पटांगणात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे, पार्श्वगायिका ईशरत जहाँ आणि ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली.

माता दुर्गेच्या भक्तीने भारलेल्या या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही ट्रस्टच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.

*पौर्णिमा आईलवार हिला शिक्षणासाठी आर्थिक मदत*

या सोहळ्याचे विशेष औचित्य साधून ए.पी.जे. अब्दुल कलाम योजनेअंतर्गत बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या बेलगाव, ता. भद्रावती येथील होतकरू विद्यार्थिनी कु. पौर्णिमा महेंद्र आईलवार हिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमातून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची ट्रस्टची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. सामाजिक कार्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष लक्षवेधी ठरला.

*मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती*

या कार्यक्रमाला माजी आमदार तथा शेतकरी नेते वामनराव चटप, आमदार देवराव भोंगळे, शिवसेनेच्या नेत्या आमदार मनीषाताई कायंदे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, शिवसेनेचे नेते किरणजी पांडव, गुरुकुंज मोझरीचे माजी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, माजी आमदार अविनाशजी वाजुरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मानस सचिव आवेश खान पठाण, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीशजी वाजूरकर, धनोजे कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तमजी सातपुते, भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, चंद्रपूरचे भाजप नेते रमेशजी राजूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू डोंगे, उपसभापती जयंतजी टेंभुर्डे तसेच आमदार करण देवतळे यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेदांतीताई देवतळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या सर्व मान्यवरांनी ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.

*नामवंत कलाकारांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत*

भव्य ‘माँ का जगराता’ कार्यक्रमाल लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे, पार्श्वगायिका व परफॉर्मर ईशरत जहाँ आणि ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा यांनी विशेष उपस्थिती व सहभाग नोंदविला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. धार्मिक उत्साह, सांस्कृतिक सादरीकरण आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

*पोलीस विभागाच्या सहकार्याबद्दल आभार*

कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कार्यक्रमाच्या विविध व्यवस्थांसाठी पोलीस विभागाने मोलाचे सहकार्य केले. या सहकार्याबद्दल आयोजकांच्या वतीने पोलीस विभागाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल श्री. रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्याला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. उपस्थित सर्वांचे आभार मानून आयोजकांनी शारदीय नवरात्रोत्सव व आगामी सणांच्या शुभेच्छा दिल्या. माता दुर्गेच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, अशी प्रार्थनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये