ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरा गेट सफारीचा शुभारंभ

वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांसाठी चोरा सफारी हे आकर्षणाचे नवीन केंद्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती :_ वनपरिक्षेत्रातील चोरा गेट सफारीचा आज दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या सफारीमुळे चोरा परिसरातील समृद्ध वनसंपदा, जैवविविधता आणि वन्यजीव पर्यटकांना जवळून अनुभवता येणार असून स्थानिक पातळीवर पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

चोरा परिसरातील जंगलामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, सांबर, चितळ, रानडुक्कर तसेच विविध प्रकारचे पक्षी व वन्यजीव आढळतात. त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांसाठी चोरा सफारी हे आकर्षणाचे नवीन केंद्र ठरणार आहे.

सफारीच्या माध्यमातून वनसंवर्धनाबाबत जनजागृती होण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्थानिक मार्गदर्शक, वाहनचालक तसेच पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना याचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

उद्घाटनप्रसंगी वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी,के. डब्ल्यू. धानकुटे साहेब, क्षेत्र सहायक व्ही . आर. ठाकरे, वनरक्षक के. डी. कांबळे, वनरक्षक डी. डी. धंदरे, वनरक्षक एम. आर. चौधरी, वनरक्षक कर्मचारी, तसेच चोरा संयुक्त वन व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, वन्यजीवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वन्यजीवांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सफारीचे नियोजन करण्यात आले आहे.

चोरा गेट सफारीच्या शुभारंभामुळे भद्रावती तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये