चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- दिनांक 09/07/2026 रोजी दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भुज उपक्षेत्रातील पद्मापुर नियतक्षेत्रात मौजा बल्लारपुर येथे अनिल भास्कर दिवटे रा बल्लारपुर वय 30 वर्षे हे मौजा पद्मापुर चक जंगलालगत कुरण गट क्र 21 येथे रानभाजी तोडण्याकरिता गेले असतांना अंदाजे वेळ दु 3.30 वा. सुमारास वन्यप्राण्याने हल्ला करुन ठार केले. सदर घटनेचा माहिती पोलीस विभगाला देण्यांत आली.
वन व पोलीस विभागाचे कर्मचाऱ्यांनी मोक्यावर हजर राहुन शवाची तपासणी व मौका पंचनामा केला. श्री. एम. बी. गायकवाड मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व वन्य) ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, श्री. ए. वि. सोनडवले वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) दक्षिण ब्रम्हपुरी व श्री. एस. एम. लोणारे क्षेत्र सहाय्यक भुज, नियतक्षेत्र वनरक्षक पद्मापुर श्री. व्हि. एम. आदे, व पोलीस कमर्चारी हे मौका पंचनामा नोंदवितांना उपस्थित होते. सदर इसमावर मानेवर जखम आढळले व तसेच मौका स्थळी थैला आढळुन आले.
मानेवरील जखमा पाहुन सदर इसमास वन्यप्राण्याने हल्ला केल्याचे प्राथमीक अंदाज वाटते. त्यांनंतर शवविच्छेदना करीत ग्रामिण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे शव नेण्यांत आले. सद्यस्थितीत मौक्यावर ट्रॅप कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे लावण्यात आलेले आहे. तसेच नियमीतपणे दिवस रात्र गस्त करण्यांत येत आहे.



