ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचा डंका, टीम कुमिते गटात सुवर्णपदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ मुंबई येथे दिनांक 9, 10 व 11 रोजी पार पडलेल्या 47 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.

महाराष्ट्र कराटे असोसिएशन द्वारा आयोजित या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत *टीम कुमिते* या गटात महिला संघाने *गोल्ड मेडल* जिंकले.

या विजेत्या संघात *ओकिनावा मार्शल अँड स्पोर्ट्स अकॅडमी, ब्रम्हपुरी / पाथरी* येथील खेळाडू *कु. स्नेहा संजय कुतरमारे आणि कु. खुशी संजय पारधी* यांचा समावेश होता.

या संपूर्ण टीमचे *मुख्य मार्गदर्शक म्हणून सीहान सोमेश्वर येलचलवार* यांनी भूमिका पार पाडली. तर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय *कराटे प्रशिक्षक सुबोध आलेवार* यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये