ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोऱ्याच्या कनिष्कची एमबीबीएससाठी बाजी

पहिल्याच प्रयत्नात प्रथम फेरीत निवड : यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        शहरातील अभ्यंकर वॉर्ड येथील रहिवासी कनिष्क स्मिता संजय पाटील याने वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कनिष्कची यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पहिल्याच प्रयत्नात प्रथम फेरीत निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे पाटील कुटुंबीयांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून कनिष्कने प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत घेतली. त्याच्या प्रयत्नांना यश मिळत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी प्राप्त झाली. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे त्याच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

कनिष्कच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या या यशामुळे वरोरा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातही आनंद व्यक्त केला जात आहे.

कनिष्कच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आह

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये