ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वायगाव निपाणी येथे चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या तीन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या पासून दोन मोबाईल, दोन वाहने व चाकू जप्त

संदीप कापडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 12 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री वायगाव येथिल संस्कार अँग्रो सुत गिरणी येथे काम करणारे कामगार (वय 36 वर्षे) हे त्यांचे मित्रासह वायगाव येथे आईच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी गेले होते. पैसे जमा करून खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन ते संस्कार ॲग्रो सूतगिरणी, वायगाव येथे परत जात असताना सूतगिरणीच्या अलीकडे असलेल्या कॅनलजवळ तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडविले. सदर इसमांनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून धाक दाखवत त्यांच्याकडील दोन मोबाईल फोन व रोख रक्कम 2,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतली. यावेळी फिर्यादीच्या डाव्या कानाखाली चाकूने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस स्टेशन देवळी येथे अपराध क्रमांक 780/2026, कलम 309(4), 309(6), 3(5), 115(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरीष्ट अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. तपासादरम्यान सदर गुन्ह्यात तीन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग निष्पन्न झाला. त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व एक चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कारवाईचा तपशील :-विधिसंघर्षग्रस्त बालके: 03 (अल्पवयीन)- जप्त मोबाईल फोन: 02 जप्त वाहने : 02 जप्त चाकू : 01 गुन्हा क्रमांक 780/2026 सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक, श्री. सौरभकुमार अग्रवाल (भापोसे), वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. सदाशिव वाघमारे वर्धा सहा. पोलीस अधिक्षक, डॉ वंदना कारखेले, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पुलगाव, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे पोलीस स्टेशन देवळी यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश मगरे, पोलीस हवालदार विनोद कांबळे ब. न. 1280, पोलीस हवालदार अमोल आलवाडकर ब. न 1470, पोलीस हवालदार श्याम गावनेर ब. न. 1493, पोलीस हवालदार गणेश बावणे ब.न. 906, पोलीस शिपाई संतोष गिते ब. न. 1711, पोलीस शिपाई आकाश कसर ब. न. 965, पो.शि अमित पटले ब.न. 125 यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे हे करीत आहे.

देवळी पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देवळी पोलीस सदैव तत्पर आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये