ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त ब्रम्हपुरीत व्याख्यान व गित गायन कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, ब्रम्हपुरी तर्फे 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा येथील पंचशील एज्युकेशन सोसायटीचे प्रांगणात दिनांक 21 व 22 ऑक्टोबर 2026 ला आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त्याने बुधवार, दिनांक 21 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भदंत दिपांकर सुमेधो चेअरमन, बुद्धीस्ट कल्चरल फाऊंडेशन, दिल्ली, मुख्य अतिथी म्हणून चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य तथा खासदार (राज्यसभा) दिल्ली तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तथा लेखक- विचारवंत, नांदेड हे उपस्थित राहणार आहेत.

तसेच गुरुवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता “टि सीरीज इंडियन आयडॉल फेम रॉक स्टार” शिवा मोहोड, मुंबई यांचा बुद्ध-भिमगीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रम्हपुरी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक रामटेके, उपाध्यक्ष सुधीर अलोने, सचिव डॉ. युवराज मेश्राम, सहसचिव राजहंस गायकवाड, कोषाध्यक्ष के. जी. खोब्रागडे, संघटक नेताजी मेश्राम, महिला संघटक छायाताई जांभुळे तसेच इतर सदस्यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये