ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिमझिम पावसाने शेती कामाला बसतोय ब्रेक

मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच; अधिकचे पैसे देऊनही मिळेनात मजूर...?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 पावसाळा सुरू होऊन मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने त्यानंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी तालुक्यातील बहुतांशी भागात रिमझिम पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीकामाला ब्रेक बसत आहे. दुसरीकडे अधिकचे पैसे देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना घरातील लहान-मोठ्या सदस्यांना शेतीकामासाठी घेऊन जावे लागत आहे.

 सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण महाराष्ट्र सह जिल्ह्यातील घाटाखालील भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून आपल्यालाही जोरदार पाऊस पडेल या प्रतीक्षेत तालुक्यातील बळीराजा आहे तालुक्यातील काही भागात पाऊस पडत आहे, तर काही भागात रिमझिम पाऊस होत आहे. मृग नक्षत्रांत जेवढा पाऊस पडला नाही त्यापेक्षा अधिकचा पाऊस पडेल, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. आज तरी कमी-अधिक पडत असलेल्या पावसावर शेतकरी आनंदी असला तरी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या तसेच लागवड काही अंशी बाकी असली तरी ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांच्या पिकांच्या वाढीसाठी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यातील काही भागात दररोज फक्त आभाळ भरून येत असून, जोरदार पाऊस काही पडत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोठा पाऊस पडण्यासाठी शेतकरी गावोगावी अन्नदान करू लागले आहेत.

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता; परंतु पहिले दोन चरण कमी पावसाचे झाले. तिसऱ्या चरणात नसला पुनर्वसू नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती; परंतु या नक्षत्रात तालुक्यातील तीनही महसूल मंडळात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह सर्वांना आहे . रिमझिम पाऊस पडत असला तरी हा पिकांसोबत तन वाढीसाठी पूरक ठरत असून त्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे कारण तणनाशक मारून सुद्धा तन नाहीसे होताना दिसत नाही त्यामुळे डवरणे आणि खुरपने यावर शेतकऱ्यांना जोर द्यावा लागत आहे डबल पैसे देऊन सुद्धा ग्रामीण भागात मजूर मिळेल असे झाले आहे

 *प्रकल्प कोरडेच विहिरीची पातळी वाढेना* मागील वर्षी मृग नक्षत्र लागण्या अगोदरच तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस प्रचंड झाला होता त्या पावसाचा फायदा झाला होता त्यामुळे शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला तसेच या पावसामुळे जमिनीत ओलावा खोलवर गेलेला होता त्यामुळे त्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली होती मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिलेले असल्यामुळे तालुक्यात खडकपूर्णा पट्टा वगळता इतरत्र जोरदार पाऊस झालेला नाही रिमझिम पावसाशिवाय मोठ्या प्रमाणात प्रजन्यवृष्टी तालुक्यात झालेली नाही तरी अजूनही तालुक्यातील ओढ्या नाल्यांना पाहिजे तसे पाणी गेले नाही त्यामुळे तालुक्यातील छोटे मोठे बंधारे नदीवरील पाण्याचे कट्टे हे कोरडेच असून मानवाला तसेच पशुधनाला पाणीटंचाई जाणू लागली आहे त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना कायम आहे.

वरुण राजा शेतकऱ्यांवर रुसला की काय, असे दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झालेले असताना तालुक्यात मात्र रिमझिम पाऊस होत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे, शेती कामाला मजूर मिळणे दुरापास्त झालेले आहे.

 आनंदा वाघ- पांगरी माळी शेतकरी

पावसाळा सुरू होऊन अजूनही पिकांसाठी योग्य असा पाऊस

झालाच नसल्याने आम्हाला शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक वर्षापासून निसर्गही साथ देत नाही आणि शासनही मदत करीत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.

 लिंबाजी डोईफोडे- डोईफोडे वाडी

शेतकरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये