ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या यशाला माजी विद्यार्थ्यांची मानवंदना

भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोंडपिपरी (मुले) येथील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावर्षी शाळेतील तेरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले होते. त्यापैकी दहा विद्यार्थी पात्र ठरून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली.

     या प्रसंगी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चेतनसिंह गौर, सदस्य तथा पत्रकार राजू झाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद तुमडे, मुख्याध्यापक अरुण झगडकर, शाळेतील शिक्षक परशुराम गेडाम व प्रांजली बावणे, तसेच पालक व अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

     मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर भविष्यातही मोठे यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश देण्यात आला. माजी विद्यार्थी मंडळाच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये