वामनराव गड्डमवार यांची विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व म्हणुन ओळख – राजाबाळ संगीडवार
पुण्यस्मरणदिनी पार पडला गुणवंताचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ वामनराव गड्डमवार हे चंद्रपूर जिल्हयातील एक द्रष्टे नेते, माजी मंत्री आणि शिक्षण तज्ञ होते, भारत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामूळे त्यांना विद्यार्थी प्रिय नेता म्हणुन ओळखल्या जाते. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामूळे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयामूळे ते विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व म्हणुन जनमानसात अजरामर आहेत. असे अध्यक्षस्थानावरून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ संगीडवार बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे आयोजीत स्वर्गीय वामनराव गड्डमवार यांच्या 23 व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन मंडळाद्वारे संचालीत विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली, कुनघाडा, भेंडाळा, मारोडा आणि बोथली येथील वर्ग १० वी आणि १२ वी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यांत आला होता.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणुन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रविंद्र चौधरी, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर, नायब तहसिलदार किशोर मडावी, वनक्षेत्र सहायक नरेश सिडाम, गटशिक्षणाधिकारी किशोर बारसागडे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, उपाध्यक्ष नंदाताई अल्लुरवार, अंकेक्षक सुनिल बल्लमवार, सल्लागार संजीव गड्डमवार, सदस्य अजय गड्डमवार, सदस्य संजयपाटील शृंगारपवार, सदस्य सुनिल नरेड्डीवार, सदस्य डाॅ. ए. चंद्रमौली, सदस्य रितेश जिडगलवार, सदस्य संजय गड्डमवार उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वर्ग 10 वी आणि 12 वी परिक्षेत प्रथम आलेल्या कुमारी प्रतिक्षा मराठे, दिक्षा जेंगठे, विनायक सोनुले हयांचा रोख रक्कम, प्रशस्ती पत्र आणि पुष्पगुच्छा देवून सत्कार करण्यांत आला. मंडळाचे अंकेक्षक सुनिल बल्लमवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना स्व. गड्ढमवार साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजु केदार आणि वनीता गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर जिवतोडे यांनी केले.
आयोजीत सत्कार सोहळयात विश्वशांती विद्यालय सावलीचे मुख्याध्यापक रविंद्र मुप्पावार, मुख्याध्यापक कुनघाडा सुधाकर मेश्राम, मुख्याध्यापक भेंडाळा अरूण राऊत, मुख्याध्यापक मारोडा धनंजय गाडेवार, मुख्याध्यापक बोथली यशवंत गोरडवार, काॅन्व्हेंटचे प्राचार्य पांडुरंग अमृतवार, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



