ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गुरुकुल महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा :- गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दिनांक 10/06/2026 रोजी महाविद्यालयाच्या मैदानी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
या प्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनीताताई लोढीया, संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, डॉ. रोनक लोढीया, प्रा. सचिन करनेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात सौ. सुनीताताई लोढीया यांच्या हस्ते विविध फळांच्या व फुलांच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे इतरही मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.



