ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माता अधिकाऱ्यांचे पद त्वरित भरा

युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कांबळे यांची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे निवेदनातून मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शेणगाव येथे मागील दीड वर्षांपासून औषध निर्माता अधिकारी (फार्मासिस्ट) पद रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन देत तातडीने फार्मासिस्टची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

       युवक काँग्रेसच्या निवेदनानुसार, प्राथमिक आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट उपलब्ध नसल्यामुळे इतर कर्मचारी व मदतनीस यांच्या माध्यमातून औषधांचे वितरण केले जात आहे. ही परिस्थिती रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असून औषध वितरणाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. युवक काँग्रेसने जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने औषध निर्माता अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा युवक काँग्रेस, जिवती तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

    हे निवेदन युवक काँग्रेसचे जिवती तालुकाध्यक्ष अमोल कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केले असून, दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये