ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे ‘संस्कार दिन’ उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         संस्कार मूर्ती आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या जन्मदिवसानिमित्त भद्रावती येथे ‘संस्कार दिन’ मोठ्या उत्साहात वासावी कन्यका माता मंदिर येथे साजरा करण्यात आला.ज्यामध्ये वर्षभर दर रविवारी चालविण्यात येणाऱ्या संस्कार केंद्रातील विद्यार्थी तसेच अनेक युवा व जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक प्रार्थनेने झाली. प्रार्थनेचे संयोजन आर्या कुत्तरमारे व उन्नती गावंडे यांनी केले. त्यानंतर क्षमता महाकाळकर हिने गुरुजींचा जीवनपट उलगडून त्यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. मुग्धा कुत्तरमारे हिने श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक ६ ‘आत्मसंयम योग’ मधील संस्कृत श्लोक सादर केले, तर विजया ताजने हिने त्याचा मराठीत अर्थ व सार सांगितले.

यावेळी श्रेयस डंभारे, रिहान काळे, हार्दीक गावंडे, अर्णव रासेकर, अद्विक ठाकरे, तन्वी देवतळे व अर्पित जांभुळकर यांनी राष्ट्रसंतांचे श्लोक, भजन व ग्रामगीतेतील ओव्या सादर केल्या.आभा कंचनवार व स्वराज गारघाटे यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व पटवून दिले, तर डिंपल भडगरे हिने महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना उल्हासजी भास्करवार व मुर्लीधरजी मेश्राम यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गुणवंत कुत्तरमारे यांनी केले, प्रास्ताविक विशाल गावंडे यांनी मांडले व आभार गजानन डंभारे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वासवी कन्यका माता मंदिर समितीचे निलेश गुंडावार व समीर उपलंचीवार यांचे सहकार्य लाभले.

शेवटी राष्ट्रवंदना, जयघोष व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित सर्वांनी गुरुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये