ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवजयंती निमित्त भद्रावती उत्सव समिती तर्फे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

हर हर महादेवच्या गजरात धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ आज भद्रावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भद्रावती उत्सव समितीच्या वतीने १५ वर्षाखालील व वरील शालेय मुला मुलींची दौड स्पर्धा संपन्न झाली.

नगर परिषद ते गणेश मंदिर या मार्गावरून छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत अनेक स्पर्धक हिरहिरीने सहभागी झाले होते. स्पर्धेची सुरुवात नगराध्यक्ष प्रफुल चटकी व इतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून केली. व्यासपिठावर उपस्थित नगराध्यक्ष प्रफुल चटकी, क्रीडा प्रशिक्षक प्रा.संगीता बांबोळे, प्राचार्य प्रकाश पिंपळकर समिती अध्यक्ष स्वप्नील मत्ते, कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती अध्यक्ष मंगेश येरमे, जेष्ठ नागरिक आनंदराव बदखल, सखी मंचच्या सुनीता खंडाळकर, प्रबोधनकार विशाल गावंडे, नागसेन पाझारे यांचे हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह व रोख पारितोषीक देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटू तयार व्हावे या उद्देशाने असे उपक्रम समितीतर्फे आयोजित केले जातील. असा मानस स्वप्नील मत्ते, निखिल उंबरकर, मनोज पेटकर, अंकित लोडे श्वेता उंबरकर, हर्षदा हिरादेवे, यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये