राजमाता जिजाऊ आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे कार्य आजही प्रेरणादायी
पुण्यतिथीनिमित्त भाजप महानगर कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर महानगरच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगर कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी वक्त्यांनी राजमाता जिजाऊ आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या राष्ट्रनिष्ठा, शौर्य, त्याग आणि नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकला. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले, तर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंर्त्यलढ्यात अद्वितीय पराक्रम गाजवत देशासाठी बलिदान दिले.
उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रहित आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी भाषण कला प्रशिक्षण महेश गोरे, जेष्ठ नेते अजय जयस्वाल, महामंत्री सविता दंढारे, प्रवीण गिलबिले, नगरसेवक जितेश कुळमेथे, नितेश गवळी, नगरसेविका आशा देशमुख, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रलय म्हशाखेत्री, प्रमोद शास्त्रकार, निलेश बेलखेडे,दिनकर सोमलकर कामगार व झोपडपट्टी आघाडीचे रामकुमार आकापेल्लीवार, राकेश नाकाडे, मंजुश्री कासनगोट्टूवार, कौसर खान विश्वजीत शहा, शशिकांत मस्के विनोद पिल्लीवार श्रीकांत भोयर आर डी बाबा अनिता झाडे, अल्का मेश्राम, सुरेश जांभुळकर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते



