ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी काँग्रेसचे BLA-2 प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर यांच्या सूचनेनुसार मतदान पुनर्निरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR) अभियानाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा आणि गोंडपिपरी तालुक्यातील BLA-2 प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीची अचूकता, नवमतदार नोंदणी आणि मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्य़ातील हे पहिलेच प्रशिक्षण शिबीर पार पडले असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

        या प्रशिक्षण शिबिराला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, राजुरा विधानसभा समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, देविदास सातपुते, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, सोनी दिवसे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, सभापती अनंतकुमार ताजने, नगरसेवक एजाज अहमद यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

        यावेळी उपस्थित पदाधिकारी व BLA-2 प्रतिनिधींना मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाचे महत्त्व, मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच बूथ स्तरावर प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

      शिबिरात गौतम नीतनवरे यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य करताना BLA-2 यांच्या जबाबदाऱ्या, मतदार पडताळणीची प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या विविध निर्देशांची सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जरी मॅपींग पुर्ण झाले असले तरी आपल्या प्रत्येक मतदारांच्या खात्रीसाठी तसेच क्षेत्रातील प्रत्येक मतदारांकडून ( Enumeration Form ) गणना पत्रक दोन प्रतित भरून घेणे आवश्यक आहे. त्याची प्रत सांभाळून ठेवण्याची गरज सुद्धा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अनेक पदाधिकारी व BLA-2 प्रतिनिधी उपस्थित होते.

        यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांनी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी दक्षतेने काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात काँग्रेस पक्षाचे BLA-2 कार्यकर्ते मतदार पुनर्निरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले असून उपस्थित कार्यकर्त्यांनी अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राजुरा, गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेसचे अनेक BLA पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये