ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयाची दखल : गडचांदूर न.प. घोटाळ्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना पत्र, कारवाईचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 गडचांदूर नगरपरिषदेचे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. येमाजी धुमाळ यांनी घनकचरा डेपोसाठी भाडेतत्त्वावर जमीन घेण्याबाबत बोगस निविदा दाखवून नगरपरिषद निधीचा अपहार केल्याप्रकरणी भाजप मंडळ अध्यक्ष अरविंद डोहे यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे.

श्री. डोहे यांनी दि. 25/05/2026 रोजी मा. नगराध्यक्ष तसेच सर्व सभापती व नगरसेवकांना पोस्टाद्वारे निवेदन देऊन विशेष सभा घेऊन फौजदारी कारवाईचा ठराव घेण्याची मागणी केली होती. त्यातील केवळ नऊ नगरसेवकांनी श्री. डोहे यांच्या पत्राचा संदर्भ देऊन कलम 81 नुसार विशेष सभा लावण्याची विनंती नगराध्यक्षांकडे केली. मात्र, नगराध्यक्षांनी सभा लावली नाही व कलम 81 चा भंग केला.

“सत्ताधाऱ्यांनी स्वतः नियमबाह्य पुलियाचे बांधकाम करून निधीचा अपहार करण्याचा कट रचला आहे. त्या प्रकरणाची चौकशी याच मुख्याधिकाऱ्यांकडे असल्याने, भीतीपोटी सत्ताधाऱ्यांनी धुमाळ यांच्याविरुद्ध ठराव घेण्याचे धाडस दाखवले नाही,” असा आरोप श्री. डोहे यांनी केला आहे.

दरम्यान, श्री. डोहे यांच्या तक्रारीनंतर सह आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दि. 16/06/2026 रोजी गडचांदूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रातील ठळक मुद्दे :*
1. श्री. येमाजी धुमाळ यांच्यावरील अपहाराच्या आरोपाबाबत श्री. डोहे यांनी केलेल्या मागणीचा संदर्भ पत्रात देण्यात आला आहे.
2. *या प्रकरणी मुद्द्यानुसार नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून* केलेल्या कारवाईबाबत तक्रारदारास व या कार्यालयास कळवावे, असे पत्रात नमूद आहे.
3. कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना क्रमांक/कार्या-10/नपप्र/टे-5/2026/192 दि. 16/06/2026 अन्वये दिल्या आहे.

“जिल्हाधिकारी कार्यालयाने माझ्या मागणीची तात्काळ दखल घेतली, त्याबद्दल मी आभारी आहे. आता मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने बोगस निविदा प्रकरणाची तसेच नियमबाह्य पुलिया बांधकामाची चौकशी करावी. दोषी आढळल्यास न.प. सभेत विषय घेऊन FIR दाखल करावी,” असा ठराव घ्यावा अशी मागणी भाजप मंडळ अध्यक्ष श्री. अरविंद डोहे यांनी केली आहे.

*मुख्याधिकारी या पत्रानुसार काय कार्यवाही करतात व सत्ताधारी या गंभीर प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये