ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती पहाडावरील शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा गौरव

नगराध्यक्ष निलेश ताजणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- परिसरातील धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्व म्हणून ओळख असलेले गडचांदूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निलेश ताजणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिवती पहाड परिसरातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात विविध प्रशासकीय विभागांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मुलांना कठोर परिश्रम, जिद्द आणि संस्कारांची शिकवण देत यशाच्या शिखरावर पोहोचविणाऱ्या पालकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाला मानवंदना देण्यात आली.

शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन २९ पालकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष निलेश ताजणे,उद्योजक संतोष मोतेवाड, पांडुरंग जाधव,अमर राठोड,सुदाम राठोड, सुरेश केंद्रे,रामसेवक मोरे, डॉ.पृथ्विराज खंदारे,महादेव डोईफोडे,खंडु सलगर, दत्तात्रय माने,गणेश कदम, देविदास साबणे, राजकुमार मुसणे, महादेव जयस्वाल,हरीहर खरवडे गुरूजी,चंद्रकांत राठोड,बालाजी भुते,भारत बिरादार, दत्ता नंदेवार,केशव गव्हाले, परमेश्वर राठोड,भानुदास घुले,यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश केंद्रे यांनी केले.पोलिसांचा तालुका म्हणून जिवती तालुक्याला प्रचिती मिळते आहे,ही आमच्या तालुक्यांसाठी अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन अमर राठोड यांनी आपल्या संबोधनात केले.आमचा जिवती तालुका मुख्य प्रवाहात येते आहे ही बाब अभिमानाची आहे,असे पांडुरंग जाधव यांनी उपस्थित बांधवांना संबंधित केले.

निलेश ताजणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दुर्गम आणि आदिवासी बहुल जिवती पहाड परिसरातील युवक-युवती आज विविध शासकीय सेवांमध्ये यश मिळवत आहेत, ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे कष्ट, त्याग आणि मार्गदर्शन महत्त्वाचे असून त्यांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे.

आगामी काळात जिवती परिसरातील शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय निर्माण व्हावे यासाठी दुध संकलन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नरत आहोत,असे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष निलेश ताजणे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता समाजाला दिशा देणारा आणि शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत प्रेरणा निर्माण झाली असून ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदांवर पोहोचावे, असा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत नगराध्यक्ष निलेश ताजणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या सत्कार सोहळ्यामुळे जिवती पहाड परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना नवी ऊर्जा मिळाली असून शिक्षण, गुणवत्ता आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रभान राठोड,सचिन लांडगे, शंकर देवकते,राजु जाधव, रामेश्वर देवकते,चंद्रभान जाधव,दत्ता शिंदे, परमेश्वर देवकते, नागोराव जाधव, साईनाथ लांडगे, पांडुरंग होडबे,

नारायण कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन सतिश मुसळे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये