ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची ३५२वी पुण्यतिथी देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना च्या वतीने विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष श्री बळीराम मापारी होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालय चे अध्यक्ष,के.पी.खांडेभराड, गोविंदराव अहिरे,मार्तंड आप्पा घिके, होते  सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी बाबुलाल शिवरकर, रमेश नरोडे, प्रकाश अहिरे, रामदास कुलथे, गोविंदराव बोरकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव श्री गोविंदराव बोरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये