ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्काऊट गाईड चळवळ समाजसेवेची आवड निर्माण करते – समीर देशमुख 

37 वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा संपन्न, 32 शाळेतील 1100 मुलांमुलीचा सहभाग 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.  अविनाश नागदेवे

देवळी : स्काऊट व गाईड चळवळीचा अभ्यासक्रम कृतीवर आधारित असून त्यात समाजसेवेचा समावेश आहे. म्हणजेच स्काऊट गाईड चळवळ मुलामुलींमध्ये शालेय जीवनापासूनच सामाजिक सेवेची आवड निर्माण करते, असे प्रतिपादन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी 37 व्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याच्या समारोप प्रसंगी 6 जानेवारी रोजी स्थानिक एस.एस.एन. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात बोलताना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, नयारा एनर्जीचे प्रबंधक संजय अग्रवाल, यशवंत संस्थेचे उपाध्यक्ष सतिश राऊत, रामदास वडयाळकर, प्रभारी प्राचार्य डॉ.प्रभाकर ढाले, रोव्हर लिडर प्रा. रविंद्र गुजरकर, रोव्हर लिडर संतोष तुरक,रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, जिल्हा संघटक नितेश झाडे व गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली अवथळे उपस्थित होते.

लोकनेते माजी आमदार सुरेशभाऊ देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्धा भारत स्काऊटस व गाईड्स जिल्हा कार्यालयातर्फे ‘नयारा’ एनर्जी लिमिटेड च्या विशेष सहकार्याने 37 वा स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन 3 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील 32 शाळांमधील 1100 स्काऊटस व गाईड्स सामील झाले होते.

या प्रसंगी बोलताना मोहनबाबू अग्रवाल म्हणाले युवावर्गावर योग्य वयातच योग्य संस्कार रुजविण्यात आल्यास देशाला समर्पित, कर्तव्यदक्ष व सुजाण नागरिक मिळू शकतील. या दृष्टिकोनातून स्काऊट गाईड ची चळवळ चांगले कार्य करीत आहे तर सतिश राऊत म्हणाले स्काऊट गाईड मधून नेतृत्वकला विकसित होते आणि प्रत्येक क्षेत्रात चांगल्या नेतृत्वाची गरज आहेच.

या वेळी जेष्ठ स्काऊटर तथा लिडर ट्रेनर रामदास वडयाळकर यांना स्काऊट गाईड क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याकरीता ‘जीवन गौरव ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पत्रकार दिना’निमित्त देवळी शहरातील पत्रकार गणेश शेंडे, सचिन वैद्य, समीर शेख, गजानन पोटदुखे, रविंद्र पारीसे व किरण ठाकरे यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

चार दिवसीय मेळाव्यात साहस खेळ, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन, बिनभांडयाचा स्वयंपाक, स्किलोरामा, समुह गीत, चित्रकला, संस्कृती दर्शनावर आधारित ‘शोभायात्रा’, प्रश्नमंजुषा, पोस्टर्स मेकिंग, अन्नकोट, तंबू सजावट व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.

साहस खेळाचे उदघाटन जेष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल तर प्रथमोपचार स्पर्धेचे उदघाटन डाॅ. चित्रांगणी तडस यांनी डाॅ. आशिष लांडे व जनता विद्यालयाचे प्राचार्य धर्मेंश झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन ‘नयारा’ एनर्जी लिमिटेड च्या करण्यात येवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी नयाराचे सुरक्षा प्रबंधक श्री. राधाकृष्ण व स्वाती कोल्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.

प्रश्न म॔जुषा स्पर्धेचे उदघाटन गुरुकुल चे प्राचार्य योगेश ढोरे व यशवंत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक मृदुला हिवंज यांनी तर बिनभांडयाचा स्वयंपाक स्पर्धेचे उदघाटन प्रहार स्कूलच्या प्राचार्या वैशाली गुजरकर व प्रा. सुनिता गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले.

स्किलोरामा स्पर्धेचे उदघाटन प्रा स्वाती पातुरकर व प्रा. मनिषा किटे यांनी तर ‘आनंद मेळाव्या’चे उदघाटन प्रा. डाॅ. निलिमा बर्गट यांनी प्रा. ममता पिलेवान व प्रा. मेघा फासगे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.

सांस्कृतिक दर्शनावर आधारित ‘शोभा यात्रेचे’ उदघाटन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख व उपाध्यक्ष सतिश राऊत यांनी केले. ‘मेरी माटी, मेरा देश’ या विषयावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असलेली ‘भव्य शेकोटी’ चे उदघाटन माजी प्राचार्या साधनाताई घोडखांदे, प्रा. विवेक देशमुख व प्रभारी प्राचार्य डॉ.प्रभाकर ढाले यांनी केले.

समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, अहवाल वाचन जिल्हा संघटक वैशाली अवथळे, कार्यक्रमाचे

संचालन दिपक गुढेकर व राजहंस जंगले यांनी तर आभार जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी केले.

समारोप प्रसंगी सहभागी 32 शाळांतील शिक्षकांना ‘जिल्हा मेळाव्याचे स्मृतिचिन्ह’ व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता स्काऊटचे सहाय्यक आयुक्त तथा उपमुख्याध्यापक सुरेंद्र उमाटे, उर्मिला चौधरी, रूपा कडू, निर्मला नंदुरकर, संगीता पेठे, याकुब शेख, अभिजित पारगावकर, रोव्हर आसीफ शेख, योगेश आदमने, संकेत हिवंज, प्रशिल अंदुरकर, हर्षदीप झाडे, शेखर भोगेकर, प्रतीक क्षीरसागर, अक्षय जबडे, साहील रामगडे, आदित्य तामगाडगे, नैना गवळी, राखी खोडे, वैष्णवी शिरभाते, प्रियंका ठोसर, हेमलता वाढीवे व रोव्हर्स-रेंजर्स नी प्रयत्न केले.

समारोपाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये