जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोपन येते 76 वा गणतंत्र दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
पंचायत समिती कोरपणा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोपण येथे 26 जानेवारी 2025 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोपन येथे गावात प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करण्यात आले.
शाळा समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला तसेच शाळेत आलेले प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले शाळेतल्या विद्यार्थ्यांनी यांनी अतिसुंदर भारत देशाला कसे स्वातंत्र्य मिळाले यांची संपूर्ण माहिती थोडक्यात चिमुकल्याने विद्यार्थ्यांनी दिल्ली यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी माता भगिनी तरुण मंडळी आणि विद्यार्थी सर्वांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
शाळेचे मुख्याध्यापक पी एन चंद्रागडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास आत्राम, शेवंता नागोसे उपाध्यक्ष, शालीक मेश्राम पोलीस पाटील, मोनिका मेश्राम सदस्य, मंगला मेश्राम अंगणवाडी सेविका, कैलास वेलादी, दौलत येडमे, शेषराव पंधरे माजी पेसा अध्यक्ष,सौ अनिता कुमरे ग्रामपंचायत सदस्य, संजय जुमनाके उपसरपंच, निखिल आत्राम पेसा अध्यक्ष या सगळ्यांच्या उपस्थित प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे संचालन प्रमोद गिरटकर पत्रकार यांनी केले