रोहित बोम्मावार यांच्या विजयाचा सावलीत जल्लोष साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सहकारी पतसंस्था/बाजार समिती ब गट 2 मधून रोहित बोम्मावार हे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल सावली शहरात फटाक्यांची अतिषबाजी करीत व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला व स्वागत करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सावली शहराचे सुपुत्र,चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट व साथ फाऊंडेशन चे अध्यक्ष रोहित बोम्मावार हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
निवडणूक लागण्यापूर्वी पासूनच रोहित बोम्मावार यांनी आपल्या प्रचार यंत्रंनेला सुरुवात केली.त्यांच्या यशस्वी सूष्म नियोजनाने त्यांनी ही निवडणूक लढली त्यात किशोर ढुमने,ऍड.वासुदेव खेळकर,प्रा.उमाकांत धांडे या व्दिगजांचा पराभव करीत 70 टक्के मते घेत एकतर्फी विजय मिळविला.
रोहित बोम्मावार यांचा विजय होताच सावली शहरात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आले.तसेच सायंकाळी सावली येथील निवासस्थानी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कार्यालयात भव्य स्वागत करण्यात आले.सावली शहरातील प्रथमच व्यक्ती हा संचालक झाल्याने अनेकांनी त्यांचे हार,पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते, नगरसेवक, बाजार समितीचे संचालक, पतसंस्था चे पदाधिकारी,पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देवून आनंद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. रोहीत बोम्मावार यांच्या सोबतच अविरोध आलेले संदीपभाऊ गड्डमवार व सौ.नंदाताई अल्लुरवार असे एकूण 3 संचालक सावली तालुक्याला मिळाले आहे.