गणराज्य दिनी मीसाबंदी स्व. नामदेवराव सालोटकर यांचा कुटुंब प्रमुख डॉ. प्रा. अशोक सालोटकर यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी येथील सेवे निमित्त रहिवासी व सिंदेवाही येथील मुळ निवासी सामाजिक व राजकीय जेष्ठ कार्यकर्त स्व. मा. नामदेवराव सालोटकर यांना संपूर्ण देशात १९७५ मध्ये आणिबाणी लागु झाल्यानंतर त्यांना सिंदेवाही येथुन अटक करुन मीसाबंदी म्हणून त्यांना नाशिक येथे १९ महिने आणिबाणी संघर्ष नायक म्हणून बंदिवान करण्यात आले होते. याची दखल महाराष्ट्र सरकारने घेऊन त्या-त्या तालुक्यातील तहसील ठिकाणी गणराज्य दिनाचे औचित्य साधुन मीसाबंदी बंदीवान म्हणून ब्रम्हपुरी येथे तहसील प्रांगणात स्व. नामदेवराव सालोटकर यांच्या नंतर त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणून डॉ. प्रा. अशोक सालोटकर यांचा काँग्रेसचे गटनेते तथा माजी मंत्री ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आम.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी राजस्व विभाग श्रीमती पर्वणी पाटील, तहसीलदार सतिश मासाळ,नगरपरिषदेचे अध्यक्ष योगेश मिसार, न. प. उपाध्यक्ष नितीन उराडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जी जगनाडे, उपस्थित होते.



