गार्गी तुलसीदास निंबोळ शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हयात प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे दि.9 फेब्रुवारी 2025 घेण्यात आलेल्या इयत्ता 8 वी च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
ख्रिस्तानंद स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ब्रम्हपुरी येथील विद्यार्थिनी कु. गार्गी तुलसीदास निंबोळ ही चंद्रपूर जिल्ह्यातून ग्रामीण आणि शहरी दोन्ही विभागातून 75 टक्के गुण घेऊन गुणवत्ता यादीत प्रथम आली. तिला इयत्ता 5 वी मध्येही शिष्यवृत्ती मिळाली होती. तिची यावर्षी इयत्ता नववी करिता नवोदय विद्यालय तळोधी जिल्हा चंद्रपूर येथेही निवड झाली होती हे विशेष.
तिने आपल्या यशाचे श्रेय्य शाळेतील शिक्षक,शिक्षिका तसेच आई वडील यांना दिले आहे. तिचे आई तसेच वडील जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
तिचे सर्व नातेवाईक आणि वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.