ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक वर्षापहीले चोरीस गेलेली मोटरसायकल व अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यास सावंगी पोलीसांना यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी पांडुरंग कोडणकर रा. इंझापुर यांनी रिपोर्ट दिला की दि. 1.6.2025 रोजी त्यांनी त्यांची बजाज प्लाटीना मोटरसायकल क. एम.एच 32 ए.एन कि. 20,000/ची घरासमोर उभी करून ठेवली होती ती रात्रदरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अशा तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे.ला अप.क. 477/2025 कलम 303(2) बी. एन.एस. प्रमाणे नोंद आहे.

सदर गुन्हयाचे तपासात असताना मुखबीरकडून माहिती मिळाली की मौजा वणी जि. यवतमाळ येथे एक ईसम गुन्हयातील चोरी गेलेली मोटरसायकल चे सह फिरत आहे. अशा माहितीवरून तात्काळ मा. ठाणेदार स.पो.नि. पंकज वाघोडे यांचे आदेशाने सावंगी येथील पोलीस स्टाफ मौजा वणी येथे रवाना होवून खबरेप्रमाणे चोरीस गेलेल्या वाहनाचा व ईसमाचा शोध घेतला असता एक अप्लवयीन मुलगा वणी रोडवर चोरी गेलेली मोटरसायकल घेवून मिळून आला. त्यास विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने व सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्याचे ताब्यातून एक बजाज प्लाटीना मोटरसायकल क. एम.एच 32 ए.एन किं. 20,000/रू.ची पंचासमक्ष जप्त करण्यात आली.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये